क्राईम
गडचिरोली : शहरात गांजा विक्री करणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला अटक

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. १६ मे)
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली शहरात मोटार सायकलवर फिरून वेगवेगळ्या ठिकाणी गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी (दि, १५ जून ) रोजी अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सागर कवडू बावणे, वय २५ वर्ष रा. कोटगल ता. जि. गडचिरोली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी कडुन १३ हजार ८०० रुपये किंमतीचा गांजा (कॅनाबीलीस) वनस्पतीचे फुले, १ मोटारसायकल ७५ हजार रुपये किंमत असलेले वाहन जप्त करण्यात आले.
आरोपी विरुध्द गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम (एनडीपीएस) १९८५ अन्वये पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करुन आरोपी ला अटक करण्यात आली आहे.सदर गुन्हाचा पुढील तपास पोस्टे गडचिरोलीचे पोउपनि दिपक चव्हाण हे करीत आहे.
.
जाहिरात
