भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.३० मे)
विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्या पुढाकाराने प्रलंबित मागण्यांसाठी २६ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्र सह गडचिरोली येथेही या आंदोलनात भूमि अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
भूमि अभिलेखच्या सर्व कर्मचा-यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, परिरक्षण भूमापक यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, वर्ग २ व वर्ग ३ च्या रखडलेल्या पदोन्नत्या देण्यात याव्या, सर्व सर्वेअर यांना लॅपटॉप व रोव्हर पुरविण्यात यावे, नवीन नगर भूमापन कार्यालयांची स्थापना करावी, शासन निर्णयाप्रमाणे भूमि अभिलेख विभागातील पदनामांमध्ये बदल करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन आहे.
या मागण्यांकरिता भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेने अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आता टोकाची भूमिका घेऊन काम बंद आंदोलन यावेळी करण्यात येत आहे.
कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना फटका
!!
भूमी अभिलेख कार्यालयात कार्यालयात कामाकरता येणाऱ्या सामान्य नागरिकाला याचा मोठा फटका बसलेला आहे अनेकांचे कामे अडकून बसलेली आहेत तसेच या कार्यालयाच्या माध्यमातून शासनाला मिळणारा कोट्यावधी रुपयांचा महसूल देखील बुडालेला आहे.
