
लोकशाही न्युज, आरमोरी (दि. ३१ मे)
आरमोरी तालुक्यातील मुद्रांक विक्रेते अधिकचे पैसे घेऊन मुद्रांक विक्री करत असल्याची तक्रार अण्णा हजारे विचार मंच जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष बसंतसिंग बैस, तालुकाध्यक्ष अनुरथ निलेकार, तालुका सचिव देवेंद्र ब्राह्मणवाडे, आरमोरी तालुका अध्यक्ष दिवाकर रामटेके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
त्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी, देसाईगंज (वडसा) यांनी तहसिलदार, आरमोरी यांचेकडून एच.एन. दोनाडकर, नायब तहसिलदार (नि.) तहसिल कार्यालय, आरमोरी यांनी दि. ०५.०३.२०२४ रोजी आरमोरी तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान मुद्रांक विक्रेत्यांकडून मुद्रांक व तिकीट खरेदी केलेल्या एकुण २९ नागरीकांचे दि. ०५ व ०६ मार्च २०२४ या कालावधीत बयाण घेण्यात आले. त्यांचे बयाणानुसार आरमोरी तालुक्यातील मुद्रांक विक्रेते सोबत बयाणानुसार मुद्रांक व तिकीटाचे रक्कम खरेदीदारांकडून जास्तीचे पैसे घेत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. आरमोरीतील तीन मुद्रांक विक्रेते दोषी आढळले.
त्या अनुषंगाने त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात परवाने निलंबित करीत असल्याचे आदेश (दि.२३ मे २०२५)पारीत करण्यात आले त्या आदेशावरती अंकिता तांदळे मुद्रांक जिल्हाधिकारी गडचिरोली यांची स्वाक्षरी आहे.
खालील मुद्रांक विक्रेत्याचा परवाना तात्पुरत्या स्वरुपात निलंबित
!!!
१) दिलीप भाऊराव इन्कने, मुद्रांक परवाना क्र.४९०४००२, २)जगदिश महादेव रामटेके, परवाना क्र.४९०४००३
३) चंद्रभान पैकुजी मेश्राम, मुद्रांक परवाना क्र.४९०४००१
यांचे परवाने तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केलेले आहे.
