३ जूनला जागतिक सायकल दिन निमित्त सायकल रॅली चे आयोजन

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ३० मे)
सायकल स्नेही मंडळ गडचिरोलीच्या वतीने ३ जुन रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त प्रथमच भव्य सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल रॅली चा मार्ग व वेळ
!!!
शहरातील इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय परत इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे समारोप) सायकल रॅली सकाळी ६ वाजता काढण्यात येणार आहे.
जागतिक सायकल दिवस हा एक जागतिक दिवस आहे. दुचाकी सायकल ही वापरण्यास आणि विकत घेण्यास सोपी आणि स्वस्त असा वाहन पर्याय आहे. त्यामुळे सर्वाँना सामावून घेणारे जागतिक स्तरावरील वाहन म्हणून सायकल कडे पाहणे याबद्दल हा दिवस साजरा करण्याचे ठरविले गेले. एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र समितीने ३ जून हा दिवस विश्व सायकल दिवस म्हणून निश्चित केला.
समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तींना सायकल चालविण्याचा आनंद घेता यावा यासाठी या दिवशी विशेष सायकल यात्रा आयोजित केल्या जातात. सायकल हे वाहन सहिष्णुता, मानवता यांचे प्रतीक आहे असा संदेश यातून पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी सायकल चालविणे उपयुक्त आहे असा संदेश यानिमित्ताने दिला जातो. यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात.
या सायकल रैलीत जास्तीत जास्त सायकल प्रेमी नागरिकांनी,कर्मचारीवृंद तसेच शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होऊन शहरातील नागरिकांचे आरोग्य, हृदयविकार,मधुमेह आणि लठ्ठपणा, प्रदूषण,पर्यावरण राखण्याचं या दिनानिमित्याने संदेश देण्यासाठी या रॅली सहभागी होण्याचे आवाहन सायकल स्नेही मंडळ गडचिरोलीचे कार्याध्यक्ष प्रा.विलास पारखी,जिल्हा सचिव उदय धकाते, विजय साळवे, प्रा.पालारपवार,उपेंद्र रोहणकर, प्रा.सुनिता साळवे,योगिता दशमुखे,सुचिता कामडी,मीरा बिसेन आदींनी केले आहे.
