गडचिरोली : वैदकीय शिक्षण घेणारे ३ भावी डॉक्टर वैनगंगा नदीत बुडाले
शोध मोहीम व बचाव कार्य सुरू

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १० मे)
गडचिरोली चंद्रपूर सीमेवरील वैनगंगा नदीच्या पुलाखाली आंघोळीसाठी गेलेल्या गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शिक्षण घेणाऱ्या ३ युवकांचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून अपघात झाल्याची धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे.
ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजता च्या सुमारास घडली असून सध्या घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे.
गडचिरोली मेडिकल कॉलेजचे जिल्हा रुग्णालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेत असणारे भावी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले आठ युवक आज सुट्टीचा दिवस असल्याने वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. मात्र, यामध्ये गोपाळ गणेश साखरे( वय-२० रा. भडगाव ता. जि. बुलढाणा), पार्थ बाळासाहेब जाधव(वय-२० रा. पाथरे खुर्द ता. राहुरी जि. अहिल्यानगर आणि स्वप्नील उद्धवसिंग शिरे (वय -२१ रा. रांजणगाव ता. वाळूज जि. छत्रपती संभाजी नगर हे तिघे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अचानक खोल पात्रात बुडाले.शोध कार्य व बचाव मोहीम सुरू आहे
