जाहिरात
गडचिरोली पोलीस

वाहतुक शाखेने साजरा केला जागतिक स्मरण दिन सप्ताह

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,२४ नोव्हेंबर)
संपादक:संदिप कांबळे

रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या, तसेच रस्ता अपघातात मंभीर जख्मी झालेल्या, अपघातामध्ये अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ तसेच अपघात पिडीतांच्या, कुटुंबियांच्या सांत्वनाकरिता त्यांना कायदेशीर मार्गदर्शनाकरीता सामिजीक जबाबदारी म्हणून दरवर्षी दिनांक १९ नोव्हेंबर हा जागतिक स्मरण दिन (World Day Of Remembrance म्हणून पाळण्यात येतो, त्या अनुषंगाने जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा गडचिरोली यांचे तर्फे दि.१९/११/२०२३ ते २४/११/२०२३ या सप्ताहा दरम्यान गडचिरोली शहरात विविध ठिकाणी बसस्टॅन्ड, तहसिल कार्यालय परीसर, इंदीरा गांधी चौक येथे वाहन धारकांना सदर बाबत संबोधन करुन वाहन चालवितांना वेगावर नियंत्रण ठेवण्याची वाहतुक शाखे कडून विनंती करण्यात आली.

(जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा गडचिरोली तर्फे शहरात जागतिक स्मरण दिनानिमित्त लावलेले फलक)

तसेच भरधाव वेगाने वाहन चालविल्यास होणा-या घटनाबाबात, अपघाताबाबत व कार्यवाही बाबत माहीती देण्यात आली, व वाहन धारकांना वाहतुक नियमांचे काटेकोर पणे पालन करण्याची विनंती करण्यात आली.

सदरचा उपक्रम गडचिरोली पोलिस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधिक्षक कुमार चिंता (प्रशासन), उपविभागिय पोलीस अधिकारी गडचिरोली मयुर भुजबळ यांचे मार्गदर्शनात जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा गडचिरोली च्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी गायकवाड, पोलिस हवालदार झोरे, पोलिस हवालदार मारगाये, महिला पोलिस छाया ठाकरे, सोनल आत्राम, पोलिस शिपाई चांदेकर यांनी प्रत्यक्ष राबविला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button