“आप” पार्टी ने साजरी केली समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२ ऑगष्ट)
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे शिलेदार कष्टकरी मजुरांची लढाई लढणारे, रशिया सारख्या देशात जाऊन भारताचे नाव लौकिक वाढवणारे समग्र क्रांतीचे स्वप्न घेऊन चळवळ चालवणारे दीड दिवस शाळा शिकून ३५ कादंबऱ्या, तीन प्रवास वर्णन, ७ हून अधिक नाटके एवढा मोठा लिखाण प्रपंच मराठी साहित्य क्षेत्रातील साहित्य सम्राट महाराष्ट्रासाठी भूमिगत होऊन डफ हाती घेऊन आपल्या शाहिरीतून समाज प्रबोधन करणारे आपल्या लिखाणातून वंचित घटकात राहणाऱ्या नायक व नायिका व्यवस्थेची कशा प्रकारे लढतात त्या लढण्यातून अनेक सत्य घटना मांडणारे प्रबोधनकार लेखक कवी अशा एक ना अनेक भूमिका साकारणारे कॉम्रेड लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली कडून साजरी करण्यात आली आहे.
ह्या प्रसंगी पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे,जिल्हा सचिव भास्कर इंगळे,महिला आघाडी अध्यक्ष मिनाक्षी खरवडे ,ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर, महिला युवा आघाडी अध्यक्ष सोनल ननावरे,सेवानिवृत्त आघाडी अध्यक्ष दिवाकर साखरे,क्रिडा सेल अध्यक्ष खेमराज हस्ते, वृत्तपत्र आघाडी अध्यक्ष अनिल बाळेकरमकर, कामगार आघाडी अध्यक्ष हितेंद्र गेडाम इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
