जाहिरात
व्हाहाडसावली

अखेर बेपत्ता “आर्यन” चा प्रेत सोनापुर नदीपात्रात सापळला

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१२ ऑक्टोंबर)
संपादक:संदिप कांबळे

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील व्याहाड बूज येथील १८ वर्षीय आर्यन यादव सातपैसे हा  इयत्ता १२ वी मध्ये नवभारत विद्यालय व्याहाड बूज येथे शिक्षण घेत होता.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास स्वतःची हिरो कंपनी ची गाडी MH-34-BQ-6457 घेऊन शौचालयास जातो असे घरी सांगून निघून गेला. त्या दिवशी पासून बेपत्ता आर्यन चा शोधाशोध सुरू होता.गाडी व्याहाड नदी किनारी सरोवर बार जवळ मिळाली होती.

घरच्या लोकांनी सर्व नातेवाईकाकडे, आजूबाजूला, गावात, बाहेर चौकशी केली असता तो कुणाच्याच घरी मिळाला नाही. त्यामुळे सावली पोलीस स्टेशनला त्याचे वडील यादव सातपैसे यांनी आर्यन यादव सातपैसे बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

तेव्हापासून सावली पोलीस आणि घरचे व्यक्ती त्याचा शोध घेत होते मात्र, त्याचा तपास कुठेही लागलेला नव्हता. अखेर १९ दिवसानंतर ११ ऑक्टोंबर रोजी सोनापूर नदीपात्रातील पाण्याच्या टाकीजवळ एक प्रेत झाडाला लटकलेला आढळून आला असल्याची माहिती मिळाली.सावली पोलीस यांनी चौकशी केली असता तो प्रेत व्याहाड बूज येथील आर्यन यादव सातपैसे याची असल्याचे सिद्ध झाले. घरातील युवक असा अचानक बेपत्ता होऊन त्याचा प्रेत मिळाल्याने सातपैसे परीवारावर शोककळा पसरली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button