जाहिरात
गडचिरोली पोलीस

छत्तीसगडच्या सीमेतून जहाल नक्षलवाद्याला पोलिसांनी केले अटक

१६ लाख रुपये होते बक्षीस, पोलीस अधीक्षकाची पत्रकार परिषदेतून माहिती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१४ ऑक्टोंबर)
संपादक:संदिप कांबळे

मूळचा छत्तीसगड राज्यातील रहिवासी असलेला चेनूराम उर्फ सुकू वत्ते कोरसा वय ४८ रा. टेकामेटा, जि. नारायणपूर छत्तीसगड याला जिल्ह्याच्या सीमा वरती भागात पोलीस स्टेशन जारावंडी व पोलीस स्टेशन पेंढरी या दोन्ही पोस्टचे घातपात करण्याच्या उद्देशाने रेखी करण्यासाठी येणार असलेल्या असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जारावंडी हद्दीतील मौजा जारावंडी ते सोहगाव जाणाऱ्या रोडवरील कुरमावडा फाट्याजवळ विशेष अभियान पथकाने विशेष अभियान राबवून त्याला अटक केली केल्याची माहिती गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक विशेष अभियान अनुज तारे,व अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी यतीश देशमुख हे हजर होते.

अटक झालेला नक्षलवादी हा सन २००० पर्लकोटा दलम मध्ये सदस्य या पदावर भरती होऊन पुढे एसीम पदावर पदोन्नती होऊन २००३ पर्यंत कार्यरत होता. सन २००३ मध्ये डीव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन २०१४ पर्यंत माड डिव्हिजन मध्ये कार्यरत होता.
सन २०१४ डीव्हीसीएम पदावरून डीमोशन होऊन आजपर्यंत उपकमांडर म्हणून कार्यरत होता.सन २०१० मध्ये मौजा कोंगाल जि, नारायणपूर छत्तीसगड एका निरप्रा दिसण्याच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.त्याचप्रमाणे सन २००९ ते २०२३ पर्यंत विविध चकमकी व अंबुश याच्यामध्ये सहभागी होता.

सन २०२३ साली मौजा हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीवरुन पोस्टे एटापल्ली जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. ००१३/२०२३ कलम ३०७, ३५३, १४३, १४८, १४९, १२० (ब) भादवी, ३/२५, ५/२७ भारतीय हत्यार कायदा, ३, ४ भारतीय स्फोटक कायदा, १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा व १३, १६, १८ (अ) युएपीए ॲक्ट अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आलेली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button