जाहिरात
क्राईम

दवंडी येथील हत्यांकांडात पत्नीसह प्रियकर व त्याचा साथी यांना घेतले ताब्यात

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली/कोरची
संपादक:संदिप कांबळे

दि.११ ऑक्टोंबर ला कोरची/बेडगाव पासुन ६ कि. मी. अंतरावर असलेल्या दवंडी या गावी राहणारा किराणा दुकानदार लखन सुन्हेर सोनार वय ३८ वर्ष, याची अनोळखी ५ ते ६ काळे कपडे परिधान केलेल्या इसमांनी घरात घुसुन त्याच्या पत्नी समोर धारदार शस्त्राने हत्या केल्याची तक्रार पोलीस मदत केंद्र, बेडगाव येथे नोंदवली होती.

१२ ऑक्टोंबर ला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन कोरची येथील पोलीस निरिक्षक फडतरे व पोमकें बेडगावचे प्रभारी पोउपनि विठ्ठल सुर्यवंशी यांनी गोपनीय यंत्रणा तयार करुन सतर्क करत गावातील रहिवासी, नातेवाईक यांचेकडे सखोल चौकशी केली असता, मृतकाची पत्नी  सरिता लखन सोनार रा. दवंडी हीचे दवंडी येथील सुभाष हरिराम नंदेश्वर या इसमासोबत अनैतिक संंबंध असल्याच्या कारणावरुन पती लखन यांच्यामध्ये नेहमीच वाद होत असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरवत मृतकाच्या पत्नीकडे अधिक विचारपुस करण्यात आली. सुरुवातीला तिच्याकडुन उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता, तिने प्रियकर व त्याच्या साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुली दिली.

मृतक लखन हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी भांडण करत होता व तिचा शारीरिक मानसिक छळ करीता होता. या त्रासाला कंटाळुन आरोपी मृतकाची पत्नी सरिता हिने तिचा प्रियकर नामे सुभाष नंदेश्वर याला सर्व हकिकत सांगत पतीचा काटा काढावा या करीता तगादा लावला. दि.९ ऑक्टोंबर रोजी लखन सोनार याच्या हत्येचा कट रचुन हत्येची जबाबदारी बळीराम गावडे रा. कुकडेल यांचेकडे देण्यात आली. नियोजीत हत्याकांड दि. ११ ऑक्टोंबर च्या रात्री १०:४५ वाजता मारेकरी बळीराम गावडे याने मृतकाची पत्नी सरिता हिच्या मदतीने घरात प्रवेश केला व धारदार शस्त्राने लखन सोनार याची निर्घृण हत्या करुन घटना स्थळावरून पसार झालेत.

सदर घटनेतील सर्व कबुली मृतकाची पत्नी सरिता हिने दिलेली असुन गुन्ह्रातील सर्व आरोपी १) सरिता लखन सोनार, ३) सुभाष हरिराम नंदेश्वर दोघेही रा. दवंडी व ३) बळीराम गावडे रा. कुकडेल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन कोरची येथे अप क्र. ९९/२०२३ कलम ३०२, ३४ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर घटनेचा तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस मदत केंद्र, बेडगाव चे प्रभारी अधिकारी पोउपनि विठ्ठल सुर्यवंशी हे करीत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button