जाहिरात
आपला जिल्हा

अखिल भारतीय गाणली समाज संघटना स्थापनेसाठी जिल्हास्तरीय सभा संपन्न

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२९ जानेवारी):

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बांधवांचे अखिल भारतीय गाणली समाज संघटना स्थापन करण्याच्या संकल्पनेला प्रतिसाद देण्यासाठी जिल्हास्तरीय सभेचे आयोजन समाजाचे नेते विजय कोतपल्लीवार यांचे अध्यक्षतेखाली गाणली समाज भवन गडचिरोली येथे घेण्यात आली.

सदर सभेत विजय कोतपल्लीवार यांनी विविध दाखले देऊन संघटनेचे महत्व विशद केले.माजी अध्यक्ष अशोक चन्नावार यांनी भविष्यातील नियोजन तथा संघटनेची उद्दिष्टे उपस्थितांना समजावून सांगितले. शंकरराव कस्तुरवार यांनी संघटन शक्ती व समाजाला संघटनेची आवश्यकता का पडावी? याबाबत सखोल मार्गदर्शन केले.सभेत विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच तालुकास्तरावरील समाज बांधव तसेच जेष्ठ नागरिक यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

सदर सभेत अखिल भारतीय गाणली समाज संघटने करिता गडचिरोली जिल्ह्यातील गाणली समाजातील एकूण २१ कार्यकारिणी सदस्यांची सर्वांमते निवड करण्यात आली. अशोक पोरेड्डीवार घोट,घनश्याम मनबतुलवार चामोर्शी, अविनाश वडेट्टीवार घोट, दिलीप शृंगारपवार कुनघाडा, संजय पंदीलवार आष्टी, शैलेश पोटवार वडसा, मंगेश गदेवार गडचिरोली, शंकरराव कस्तुरवार गडचिरोली, प्रकाश तोडेवार गडचिरोली, रविभाऊ चन्नावार गडचिरोली, अतुल नागुलवार गडचिरोली, प्रविण चन्नावार गडचिरोली, श्रीनिवास गोडशेलवार गडचिरोली, बंडोपंत वडेट्टीवार गडचिरोली, स्नेहल संतोषवार गडचिरोली, प्रशांत सावकार पोरेड्डीवार गडचिरोली, विजय शृंगारपवार गडचिरोली, कमलाकर वडेट्टीवार गडचिरोली महिला सदस्य सौ.निता वीरेंद्र वडेट्टीवार गडचिरोली, सौ.पपिता नरेन्द्र चन्नावार गडचिरोली, सौ.ममता प्रशांत कोतपल्लीवार गडचिरोली तर मागदर्शक म्हणून अशोक चन्नावार गडचिरोली विजय कोतपल्लीवार गडचिरोली यांची निवड करण्यात आली.सभेचे संचालन नितीन संगीडवार यांनी तर आभार प्रदर्शन रविंद्र आयतुलवार यांनी केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button