जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली : शहरात साकारतोय २५ हजार दर्शक बसण्याची क्षमता असणारा क्रिकेट स्टेडियम

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२८ जानेवारी)

गडचिरोली शहरात लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून आयोजित एमआयडीसी मैदान कोटगल रोड येथे तात्पुरत्या स्वरूपाचा क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येत आहे. ज्या क्रिकेट स्टेडियम मध्ये २५ हजार लोक एकाचवेळी बसून क्रिकेट सामन्याचा मनमुराद आनंद लुटणार आहेत.

गडचिरोली शहरात क्रिकेटचा जोर सध्या फार मोठ्या जोरात सुरू आहे त्यामुळे धानोरा रोड स्थित जिल्हा प्रेक्षागार मैदानावर खेळ सुरू असून लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड कडून आयोजित क्रिकेट सामन्याचा अधिकाधिक लोकांनी आनंद लुटावा याकरिता एमआयडीसी मैदान कोटगल रोड येथे भव्य दिव्य तात्पुरत्या स्वरूपातील क्रिकेट स्टेडियमची उभारणी सुरू आहे. लवकरच क्रिकेट स्टेडियम ची उभारणी होऊन ५ फेब्रुवारी पासुन क्रिकेट सामन्याचा आस्वाद गडचिरोली वासीय जनता जनार्दन घेणार आहेत.

(एस. एस. खांडवावाला पूर्व डीजीपी गुजरात व बीसीसीआय सदस्य मैदानाची पाहणी करताना)

शहरातील तात्पुरता क्रिकेट स्टेडियम बघण्याकरिता लोकांची तोबा गर्दी
¶¶¶
गडचिरोली शहरातील एमआयडीसी मैदान कोटगल रोड येथे तात्पुरत्या स्वरूपातील क्रिकेट स्टेडियम ची उभारणी होत आहे त्यामुळे गडचिरोली शहरातील असंख्य क्रिकेट रसिकांनी स्टेडियम बघण्याकरिता एकच गर्दी केल्याचे दृश्य दिसत आहे.

अत्याधुनिक यंत्रासह अनेक मजूर कामाला
¶¶¶
या तात्पुरत्या स्टेडियमच्या उभारणीकरिता लॉयड मेटल ऍड एनर्जी लिमिटेड यांचे कडून अत्याधुनिक यंत्र व अनेक मजूर स्टेडियम च्या उभारणी करिता लागलेले असून आठ दिवसात संपूर्ण ग्राउंड व मैदान तयार होईल व खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होत आहे. व गडचिरोलीवासीय जनतेला क्रिकेटचा आनंद घेता येईल अशी माहिती लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड च्या अधिकारी वर्गानी दिली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button