जाहिरात
आपला जिल्हा

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

रस्ता सुरक्षा अभियान-२०२५ अंतर्गत विविध स्पर्धा

Spread the love

लोकशाही न्युज, भामरागड / चामोर्शी (दि.२५ जानेवारी)

रस्ता सुरक्षा अभियान-२०२५ अंतर्गत भव्य स्पर्धेचे आयोजन दिनांक २१ व २२ जानेवारी २०२५ रोजी भामरागड तालुक्यातील लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथे करण्यात आले होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त झालेल्या स्पर्धेत इयत्ता १ ते ७ साठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच इयत्ता ८ ते ९ व ११ साठी भाषण स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचा समारोप आज बक्षीस वितरणाने झाला. याप्रसंगी गडचिरोली उपविभागीय परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक (आर टी ओ) किरण शिंंदे उपस्थित होते त्यांनी स्वतः विजेत्या मुलांना हेल्मेट बक्षीस दिले. मोटर वाहन निरीक्षक (आर टी ओ) किरण शिंंदे यांनी वाहतूक नियम तसेच घ्यावयाची खबरदारी यावर मार्गदर्शन करून हस्तपुस्तिकेचे वितरण केले.

(स्पर्धेतील विजेत्यांना हेल्मेट प्रदान करताना मोटर वाहन निरीक्षक आकाश शिंदे)

चामोर्शीत विविध स्पर्धा
¶¶¶
रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. २४ जानेवारी रोजी बोमनवार हायस्कूल चामोर्शी येथे निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेमध्ये इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. स्पर्धेनंतर उत्कृष्ट प्रथम तीन स्पर्धकांना हेल्मेट व रोख रुपये पाचशे देऊन सन्मान करण्यात आला. सदर स्पर्धेचे आयोजन मोटार वाहन निरीक्षक अक्षय सोळंकी व किरण शिंदे यांनी केले. बोमनवार हायस्कूल मधील प्राचार्य व इतर शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्तम नियोजन केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button