गडचिरोली : काटली येथील ग्रामसेवक शरद येल्टीवार यांना हटवा
आजाद समाज पार्टी व दलित पँथर ची जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२३ जानेवारी)
गडचिरोली मुख्यालयापासून पासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचायत समिती अंतर्गत मौजा काटली येथील ग्रामसेवक शरद राजेश्वर येल्टीवार यांची प्रशासकीय कारकीर्द अत्यंत बेजबाबदार असून ते आपल्या पदाच्या कार्यात हयगय करत असतात. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे वा त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी तक्रार दलित पॅंथरचे जिल्हाध्यक्ष अनुप मेश्राम व बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांनी आपापल्या तक्रारीतून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे.
ग्रामसेवक शरद राजेश्वर येल्टीवार नेहमीच आपल्या कार्यालयात गैरहजर असतात तसेच त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता उडवाउडवीची उत्तरे ते देत असतात. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेला ते नेहमीच गैरहजर असतात. मासिक सभेला सुद्धा उपस्थित राहत नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
अनेकदा कार्यालयीन वेळेत ते नशेत असल्याचे सुद्धा तक्रारीत नमूद केले आहे. त्याच प्रमाणे आमच्या कार्यकत्यांनी काही महत्वाची माहिती मागितली असता त्यांनी माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन सुद्धा केले.असे ही निवेदनात म्हटलं आहे.

(दलित पॅंथर चे जिल्हाध्यक्ष अनुप मेश्राम यांची तक्रार)
सदर बाब गंभीर असून जनतेसह हि प्रशासनाची सुद्धा दिशाभूल आहे. ग्रामसेवक शरद येल्टीवार यांची सदर बाबींची चौकशी करून तात्काळ निलंबित करावे अशी मागणी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, काटली ग्रामपंचायत सदस्य देवा भोयर, रेवनात मेश्राम यांनी केली. व दलित पॅंथर चे जिल्हाध्यक्ष अनुप मेश्राम यांनी केली आहे.
