जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली :  २६ व २७ जानेवारी रोजी वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्य अधिवेशन

राज्यभरातून उपस्थित राहणार पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२३ जानेवारी):

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन २६ व २७ जानेवारी २०२५ रोजी संस्कृती सांस्कृतिक सभागृह गडचिरोली येथे होत आहे अशी माहीती राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटणकर यांनी दिली. २७ जानेवारी सोमवार रोजी सकाळी ११ वाजता संस्कृती संस्कृती सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.

२६ व २७ जानेवारी असे दोन दिवस वृत्तपत्र विक्रेत्यांचे अधिवेशन होत आहे या अधिवेशनाचे उद्घाटन लाॅयड्स मेटल्स स्टील प्लांट कोनसरी कंपनीचे रेसिडेंटल डायरेक्टर कर्नल विक्रम मेहता यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी खनिकर्म व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर हे आहेत. ठाण्याचे आमदार संजयजी केळकर, गडचिरोली- चिमूर चे लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, गडचिरोली जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी खासदार अशोक नेते, माजी आ. देवराव होळी, माजी आ. कृष्णाजी गजबे, पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार सल्लागार शिवगोंड खोत, चामोर्शी बाजार समितीचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश सा. पोरेड्डीवार, गडचिरोली न. प. माजी सभापती विजय गोरडवार हे उपस्थित राहणार आहेत.
रविवार २६ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता राज्यभरातील सर्व वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते यांचे गडचिरोली येथे आगमन होईल. दुपारी चार वाजता महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राज्य संघटनेच्या कार्यसमितीची बैठक होणार आहे. सहा वाजता राज्य संघटनेची सर्वसाधारण सभा होईल. रात्री आठ वाजता खुली चर्चा होणार असून त्यानंतर पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
राज्य संघटनेचे खुले अधिवेशन २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार असून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करण्याची घोषणा मागील सरकारने केली असून मंत्रिमंडळामध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे. हे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ तात्काळ कार्यान्वित करून वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी मुख्य मागणी या अधिवेशनामध्ये असणार आहे. याशिवाय वृत्तपत्र विक्रेत्यांच्या इतर प्रश्नांसह वृत्तपत्र वितरण वृत्तपत्र व्यवसाय या बाबींवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री पाटणकर यांच्यासह राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, सल्लागार शिवगोंड खोत, कार्यकारणी सदस्य दत्तात्रय घाडगे, संजय पावसे, गोपाळ चौधरी, राज्य संघटनेचे संघटन सचिव विनोद पन्नासे, उपाध्यक्ष दिनेश ऊके, अधिवेशनाचे आयोजक गडचिरोली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अनिल बाळेकरमरकर, अधिवेशन संयोजक राजेन्द्र गव्हारे, संजय आकरे, सचिव लोमेश बांबोळे, कोषाध्यक्ष प्रशांत वाढई, सहसचिव मारोती बाळेकरमकर, प्रसिद्धी प्रमुख अंकुश बोबाटे, संदीप आकरे, देवेंद्र बारापात्रे, पुरुषोत्तम रोळे, केशव हुकरे, उमेश सोनटक्के आदी पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button