जाहिरात
क्रीडा

क्रिकेटच्या खेळातून आनंद द्विगुणित करावा : क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन

गडचिरोली प्रीमियर लीग सीजन ८ चे थाटात उद्घाटन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२० जानेवारी)

गडचिरोली प्रीमियर लीग चे उद्घाटन दिनांक २० जानेवारी २०२५ ला क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन व मराठी सिनेमा सृष्टीची अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे शुभ हस्ते करण्यात आली. दीप प्रज्वलना नंतर मंचावरील सर्व उपस्थित मान्यवरांना वडेट्टीवार फॅन्स क्लब तर्फे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

विजय वडेट्टीवार फॅन्स क्लब तर्फे सीजन ८ ची सुरुवात म्हणजे गडचिरोली सारख्या अतिदुर्गम व मागास भागात ही क्रिकेटची पर्वणी समजावी यातून क्रिकेट मधून प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी क्रिकेटकडे विशेष लक्ष देऊन आपले करिअर सुद्धा घडवावे असे कार्यक्रमाचे उद्घाटक क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यांनी याप्रसंगी म्हटले. तसेच कार्यक्रमाच्या उद्घाटिका मराठी सिनेतारका श्रुती मराठे यांनी माझ्यासाठी स्पोर्ट्स महत्वाचे असून मी कराटे खेळली व कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट मिळवली आहे.मला सुद्धा क्रिकेट कळते, खेळते व पाहत असते.

(गडचिरोली प्रीमियर लीग सीजन ८ चे शुभारंभ करताना सुप्रसिद्ध क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन)

गडचिरोली प्रीमियर लीग सीजन ८ च्या प्रसंगी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान तसेच नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबले यांनी खेळाडूंना खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच शुभेच्छा दिल्या.

( क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन व  सिनेतारका श्रुती मराठे यांना बघण्यासाठी क्रिकेट स्टेडियमवर खचाखच गर्दी)

गडचिरोली प्रीमियर लीग सीजन ८ च्या उद्घाटन प्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्हा हा निसर्गाने नटलेला असून यामध्ये क्रिकेट खेळ हा मोठ्या आनंदाने खेळला जातो दरवर्षी किमान या खेळातून दोन तरी खेळाडू तयार व्हावेत व त्यांनी आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची निवड व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची बोलत होते तसेच पुढील काळात याच ग्राउंडवर विसीए च्या मदतीने रणजी क्रिकेट मॅच होतील गडचिरोली जिल्ह्याचा मुलगा उद्या भारतीय क्रिकेट संघात दिसू शकेल एवढे विद्यार्थ्यांमध्ये गुण आहेत आणि त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया असेही ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय वडेट्टीवार क्लबचे सचिव राकेश नागरे, संचालन किशोर पाचभाई तथा आभार प्रदर्शन यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंडू शनिवारे, अजय तुम्हावार, विनोद मैद, अजय बर्लवार, राहुल निलमवार,अनुराग कुडकावार,प्रसाद कवासे, मनीष वाळके,मनीष गुड्डेवार मंगेश देशमुख, नंदू कायरकर,अक्की मडावी,सर्वेश पोपट,आदींनी सहकार्य केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button