असोला जहांगीर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी श्री.सुभाष मुंढे तर उपाध्यक्ष पदी पद्मावती शेळके
संदिप म्हस्के
जिल्हा प्रतिनिधी
असोला येथील जिल्हा परिषद शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची कार्यकारणी दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी संपन्न झाली. यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री सुभाष लक्ष्मण मुंढे तर उपाध्यक्ष म्हणून पद्मावती दगडुबा शेळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व सदस्य म्हणून मीना संदीप जायभाये, ज्ञानेश्वर साहेबराव मांटे, सुरेखा भीमराव म्हस्के, गणेश कारभारी मांटे,गजानन घुगे,कावेरी सुनील वाकोडे,गजानन ज्ञानदेव शेळके,सोनाली गजानन शेळके,सचिन दामोदर शेळके, , यांची सर्वानुमते सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक सय्यद सर व तसेच त्यांचे सर्व कर्मचारी वृंद यांनी ही शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक व्यवस्थितरित्या पार पाडली, तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांना मुख्याध्यापक सय्यद सर यांनी बोलताना सांगितले की आमच्या शाळेतील कोणत्याही कर्मचारी किंवा मी स्वतः माझ्या जबाबदारीला चुकत असेल तर आम्हाला तुम्ही स्वतःहून सांगत चला व कोणत्या ही पालक मंडळीचा काही अडचण असली तर तीही सांगत चला कारण माझ्या हाताने या असोला गावातील असंख्य माझे विद्यार्थी माझ्या हातून घडलेले आहे व त्यांनी या गावाचे व या जिल्हा परिषद शाळेचे नाव या गावातच नव्हे तर महाराष्ट्रात नाव उंच केलेले आहे.तसेच इथून पुढेही माझ्या शाळेतील विद्यार्थी या गावाचे व शाळेची नाव लौकिक करतील अशा पद्धतीने आम्ही जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकवृंद पुरेपूर प्रयत्न करू अशी त्यांनी पालक मंडळी व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व मंडळींना आश्वासन दिले.शाळा व्यवस्थापन समितीची नवीन अध्यक्ष श्री सुभाष मुंढे यांनी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक वृंद तसेच गावातली पालक मंडळी यांना बोलताना सांगितले की
मी माझ्या पदाला पूर्ण पणे न्याय देण्याचा प्रयत्न करेल व माझ्यावर पालक वर्गानी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी तढा जाऊ देणार नाही. अशी ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष यांनी यावेळी दिली. यावेळी गावातील सर्व पालक वर्ग, पक्षीय नेते ,गावकरी मंडळी व तरुण युवक उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांची सर्व पालक मंडळी शिक्षक वृंद व गावकरी अभिनंदन करीत आहे.