जाहिरात
भ्रष्टाचार

तलाठी १२ हजार घेतांना एसीबी च्या जाळ्यात,आठवड्यातील दुसरी घटना

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१५ ऑगस्ट)
संपादक : संदिप कांबळे

तलाठी साझा क्रमांक १५, वडधा मंडळ कार्यालय देऊळगाव ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील तलाठी रमेश महागु कवडो, वय ३२ वर्षे यांना १२ हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत विभाग गडचिरोलीच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त, तक्रारदार यांचे मालकीचे ट्रॅक्टरने त्यांचे वाहन चालक मौजा डार्ली येथील खदाणीतून मुरुमाची वाहतूक करत असतांना आरोपी तलाठी रमेश महागु कवडो यांनी ट्रॅक्टर पकडून पंचनामा करून सोडून दिल्याचा मोबदला म्हणून १५ हजार रुपयांची मागणी केली होती, पण तक्रारदार यांना रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकान्यांना भेटुन तक्रार नोंदवली. व सापळा रचण्यात आला. व सदर आरोपी
तलाठी रमेश महागु कवडो याला त्याच्याच घरी लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकळण्यात आले,आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन आरमोरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, सचिन कदम, अपर पोलीस अधिक्षक नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक नागपूर व कु. अनामिका मिर्झापूरे नागपूर यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांचे पर्यवेक्षणात शिवाजी राठोड,नथ्थु धोटे, स्वप्निल बांबोळे, किशोर ठाकुर, संदीप उड़ान, संदिप घोरमोडे, प्रफुल डोलीकर सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी पार पाडली आहे.

 

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button