भिकारमौशी येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीने प्रेमियुगलांचा लावून दिला विवाह

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१३ ऑगस्ट)
संपादक:संदिप कांबळे
गडचिरोली जिल्हा मुख्यालया पासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावरील भिकार मौशी या गावी आज दि, १३ ऑगस्ट रोजी गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समिती च्या वतीने भिकारमौशी या गावी ची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत आंबेटोला येथील गाव समीतीचे अध्यक्ष रामभाऊ रावजी बामनवाडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली,त्या सभेत गावातील प्रेमी युगुलांचा विवाह लावून देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.मौजा आंबेटोला येथील रहिवासी वर ज्ञानेश्वर तेजराम ठाकरे व वधू मुरूमबोडी येथील स्वाती लालाजी पदा यांचा विवाह आंबे टोला गाव वासियांच्या साक्षीने वाल्मिकी ऋषी मंदिर देवस्थान येथे विवाह सकाळी ०९:३० वाजता लावून देण्यात आला.
या प्रेमी युगलांच्या विवाह सोहळ्याला रेवनाथ मेश्राम, हरिश्चंद्र खंडारे, अलका सयाम, सुरेखा खंडारे, अतुल राऊत, जगदीश साखरे, श्रावण साखरे, दिवाकर ठाकरे, डंबाजी साखरे यांची उपस्थिती होती.
