मुतनूर, कोठरीच्या विकासासाठी प्रणय खुणे यांचे योगदान

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१२ ऑगस्ट)
संपादक : संदिप कांबळे
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून ४५ किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या कोठरी बुद्ध विहार फाउंडेशनचे मेंबर तसेच डीपीसी च्या माध्यमातून कोठरी बुद्ध विहार पर्यटन सारख्या विकास कामाला चालना तसेच चामोर्शी तालुक्यातील मुतनूर देवस्थान येथे लोकवर्गणीतून विकास निधी, विकासाला प्रतिसाद तसेच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी अशा अनेक विकासात्मक कामाची मुहूर्तमेढ प्रणय खुणे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी गडचिरोली यांनी रोवली आहे. तसेच पुढील काळात पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेऊन कोठरी व मुतनूर सारख्या पर्यटन स्थळी अधिक विकास निधी आणून पर्यटन स्थळाला अधिक सुशोभीत करण्याचे काम करणार आहेत.
प्रणय खुणे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी गडचिरोली यांनी शासकीय नोकरीचा त्याग करून स्वतःच्या कर्तुत्वाने शून्यातून विश्व निर्माण करून गडचिरोली जिल्ह्यात बांधकाम व्यवसायत फार मोठी क्रांती घडवून आणून स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण करून गडचिरोली जिल्ह्यातील जनमाणसात त्यांनी आपले नावलोकिक सुद्धा कमविलेले आहे.
गडचिरोली हा आधीपासूनच दुर्गम व बहुल जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नावारूपास आहे प्रणय खुणे यांनी व्यवसाया सोबत आपली सामाजिक बांधिलकी सुद्धा जोपासलेली असून, त्यानी जोपासलेली सामाजिक बांधिलकी आजही दुर्गम अतिदुर्गम,व ग्रामीण भागातील जनतेला अनमोल व प्रेरणादायी ठरताना दिसत आहे. या जिल्ह्यात विकासांची अनेक कामे करताना, त्यांनी स्वतःचा जीव मुठीत घालून,विकास कामांची मुहूर्तमेढ आपल्या खांद्यावर घेऊन अनेक विकास कामाना उजाळा सुद्धा दिलेला आहे. तसेच आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यात काम करताना आमदार, खासदाराना सुद्धा ज्या वेदना झाल्या नाहीत त्या वेदना प्रणय खुणे यांनी सहन केलेल्या आहेत.
