५ हजार रुपयाची लाच घेणारा पोलीस ए. सी. बी.च्या जाळ्यात

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,११ ऑगस्ट)
संपादक:संदिप कांबळे
अपघाताच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी ५ हजार रुपयाची लाच मागणाऱ्या आरमोरी पोलीस ठाण्यातील प्रकाश हनुमंत जाधव, वय ३९ वर्षे, पद- पोलीस नाईक, ब.नं. २८७२, पोलीस स्टेशन, आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील असून त्याचेवर पोलीस ठाणे आरमोरी येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अप.क्र. ४०८/२०२२,कलम २७९, ३३७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन प्राप्त माहिती नुसार पोलीस शिपायाने तक्रारदाराकडून ५ हजार रुपये मागितल्याचे पंचा समक्ष सिद्ध झाल्याने आरोपी पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे.
सदर सापळा रचून कारवाई करणारे पोलीस उपअधिक्षक अनिल लोखंडे यांचे पर्यवेक्षणात श्रीधर भोसले, नथ्थु थोटे, राजु पदमगिरीवार, किशोर जौंजारकर, किशोर ठाकुर, संदिप उडाण, संदीप घोरमोडे, विद्या म्हशाखेत्री,प्रफुल डोर्लीकर हे होते.
