जाहिरात
विधानसभा गडचिरोली

भाजपा चे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचाराचा झंझावात

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१२ नोव्हेंबर)

भाजपा- महायुती चे अधिकृत उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान येथे दिंडी च्या माध्यमातून भाजपाचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा स्वागत करण्यात आले. भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे हे गावन गाव पिंजून काढत आहेत.

डॉ.मिलिंद नरोटे यांनी विदर्भाची काशीच्या नावाने – प्रसिद्ध मार्कंडा देवस्थानातील मार्कंडेश्वर ऋषीचे दर्शन घेतले व चामोर्शी तालुक्यात जनआशीर्वाद – यात्रेला प्रारंभ केला. चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा, फराडा, – मोहुर्ली, रामाळा, घारगाव, खंडाळा, दोटकुली, वाघोली, वेलतूर, एकोडी, कमळमगाव, कान्होली, सगणापूर, मुरखळा माल,नवेगाव माल, फोकुर्डी, कोंडाळा, चाकलपेठ, वागदरा, गदरा, नागपूर चक, मुरखळा चक, वाकडी, रामसागर, लखमापूर बोरी, भिक्षी, हळदी माल, गणपूर या गावांमधून रॅलीच्या माध्यमातून जनआशीर्वाद यात्रा काढून नागरिकांचा आशीर्वाद घेण्यात येणार आहे. सोमवारी चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथून निघालेली जनआशीर्वाद यात्रा दोटकुली येथे पोहोचली आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांना मतदार बांधवाचा मोठ्या प्रमाणत आशीर्वाद मिळाला. या क्षेत्रातील नागरिकांकडून दिंडी काढून भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा भव्य स्वागत करण्यात आला. जनआशीर्वाद यात्रेतून महायुती व भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी मागील १० वर्षांमध्ये भाजपाच्या सरकारने केलेल्या कार्याची महती सांगितली. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची समस्या, सामान्य नागरिकांना मुलांच्या शिक्षणासाठी होणाऱ्या आर्थिक समस्येवर मात करण्याची ग्वाही भारतीय जनता पार्टी व डॉ. मिलिंद नरोटे कटिबद्ध असल्याची माहिती देण्यात आली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button