जाहिरात
विधानसभा गडचिरोली

गडचिरोली: भाजपा बैठकीत ठरली डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाची रणनिती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि. १२ नोव्हेंबर)

डीएसआर नगर भवन, गडचिरोली येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ते, बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांची एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. भाजपाच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांना आगामी निवडणुकीत विजयी करण्यासाठी या बैठकीत विस्तृत संघटनात्मक मार्गदर्शन देण्यात आले. बैठकीचा समारोप माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

अशोक नेते यांनी भाजपाच्या आगामी निवडणूक धोरणांवर सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येक कार्यकर्ता, बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांनी भाजपाच्या धोरणांचे लाभ स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणाले. जनतेच्या प्रश्नांना सोडवण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधून भाजपाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने घेण्याचे आवाहनही अशोक नेते यांनी केले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, समन्वयक प्रमोद पिपरे, भाजपाचे जेष्ठ नेते गजानन येंगदलवार, जेष्ठ नेते सुधाकर येंगदलवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, कामगार आघाडी प्रदेश सदस्य गोवर्धन चव्हाण, ज्येष्ठ नेते प्रशांत भुगुवार तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button