१३ नोव्हेंबर ला प्रियंका गांधी गडचिरोलीत
काँग्रेस उमेदवार मनोहर पोरेटी यांच्या प्रचारार्थ 'रोड शो'

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि, ८ नोव्हेंबर)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या व सोनिया गांधी यांच्या कन्या व राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी ह्या येत्या १३ नोव्हेंबरला काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर पोरेटी यांच्या प्रचारासाठी गडचिरोली शहरात रोड शो करणार आहेत. गडचिरोली मध्ये ते रोड शो करून मनोहर पोरेटी यांना विजयी करण्याचा आवाहन गडचिरोली विधानसभेतील जनतेला करणार आहेत.
या रोड शो मध्ये विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, व काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे सहभागी असणार आहेत. प्रियंका गांधी यांच्या गडचिरोलीमध्ये येण्याने महिला व जनमानसात उत्साहाचे वातावरण संचारले आहे.
गडचिरोली शहरात रोड शो असा राहील
¶¶¶
कात्रटवार कॉम्प्लेक्स येथील काँग्रेस कार्यालयातून रोड शो ला सुरुवात होईल.इंदिरा गांधी चौक ते त्रिमूर्ती चौक,कारगिल चौक,बस स्टॉप असा रोड शो असेल.
