जाहिरात
गडचिरोली

८ नोव्हेंबर ला पत्रकार अंजना ओम कश्यप गडचिरोलीत

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,७ नोव्हेंबर)

आज तक न्यूज चॅनलच्या प्रसिद्ध पत्रकार न्युज अँकर अंजना ओम कश्यप ८ नोव्हेंबर शुक्रवार ला गडचिरोलीत येत आहेत. त्यांच्या समवेत टुडे इंडिया चे जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई हे सुद्धा येणार असल्याची माहिती आज तक न्यूज चॅनलचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी व्यंकटेश दुडमवार यांनी दिलीआहे.

अंजना ओम कश्यप ह्या हेलिकॉप्टर ने दुपारी १ वाजता गडचिरोलीत दाखल होत आहेत. आज तक न्यूज चॅनल च्या वतीने १:३० वाजता आयटीआय स्क्वेअर सावरिया हनुमान चौक कॉम्प्लेक्स, २ वाजता आयटीआय चौक कॉम्प्लेक्स, २:३० वाजता त्रिमूर्ती चौक, ३ वाजता गांधी चौक,३:३० वाजता बस स्टॉप तहसील कार्यालय समोर येथे येणाऱ्या गडचिरोली विधानसभा निवडणूक प्रसंगी जनतेच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button