गडचिरोली: डॉ. मिलिंद नरोटे यांना नाभिक समाजाचा जाहीर पाठिंबा

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,७ नोव्हेंबर)
भारतीय जनता पार्टी,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा गडचिरोली विधानसभा क्षेत्र गडचिरोली चे उमेदवार डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा गडचिरोली यांचा जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्रक जाहीर करण्यात आले आहे.
जाहीर पाठिंबा देण्याविषयी नाभिक समाजाची बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये सर्व समाज बांधवांच्या मते ठरविण्यात आले की उच्चशिक्षित, उच्चविभुषित स्पंदन फाउंडेशन च्या मदतीने विविध कार्य करणाऱ्या डॉ. मिलिंद रामजी नरोटे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) उमेदवार यांना सर्वानुमते जाहीर पाठिंबा देण्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आले.

(नाभिक समाजाने डॉ. मिलिंद नरोटे यांना पाठिंबा दिल्याचे पत्रक)
पाठिंब्याच्या पत्रकावर पूर्व विदर्भ विभागीय कार्याध्यक्ष नामदेव शेंडे,जिल्हा अध्यक्ष तुषार चोपकर,शहर अध्यक्ष हरीश कडुकर,पूर्व विदर्भ विभागीय उपाध्यकश नामदेवजी इझनकर, जिल्हा सचिव रुपेश भंडारे,
शहर सचिव हितेश कावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
