गडचिरोलीताज्या घडामोडी
पूरबुडी मदतीपासून वंचित शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीचे निवेदन आणून द्या, आमदार डॉ देवराव होळी यांचे आवाहन
गडचिरोली (दि,९ नोव्हेंबर)
ज्या शेतकऱ्यांची पिके खरोखरच पुरामध्ये बुडाली, ज्यांची पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झाली. अशा शेतकऱ्यांना शासनाने पूरबुडीची मदत जाहीर केली आहे. मात्र शासनाच्या पूरबुडीच्या लाभास पात्र असूनही पूरबुडीचा लाभ मिळाला नाही अशा लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पूरबुडीच्या नुकसानी संदर्भातील तक्रारीचे निवेदन आपल्या सोयीच्या दृष्टीने पडणाऱ्या गडचिरोली किंवा चामोर्शी येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात आणून द्यावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी पूरबुडी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना केले आहे.
जाहिरात
