जाहिरात
गडचिरोलीविशेष

भूमी अभिलेख कार्यालयाचा महाप्रताप ! एकाच्या मोजणीने, दुसऱ्या शेतकऱ्यांचा केला सातबारा हद्दपार

कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी यांच्यावर गुन्ह्याची नोंद करा.

Spread the love

गडचिरोली ( दि, 8 नोव्हेंबर)
मौजा गडचिरोली (जुना भुमापन क्र. 548/2, 549 (आराजी 0.87 हेक्टर आर) ही जमिन भुधारक श्री आनंदराव रामन्ना कमळापुरवार यांच्या मालकीची होती. त्यांचेकडून श्री आनंदराव गणुजी कांबळे ह्यांनी खरेदी हक्काने घेऊन (फेरफार क्र. 912, 913) दिनांक 23/11/1995 अन्वये क्षेत्र आराजी 0.60 हेक्टर आर खरेदी केली त्यानुसार सव्हें नं. 548/2,549 – 2 नविन सातबारा तयार करण्यात आला. उर्वरित 548/2,549 -1 (आराजी 0.27 हेक्टर आर) जमिन मिराबाई पत्र सोमनकर ह्यांनी खरेदी केली त्यानुसार पुनमोजणी मध्ये श्रीमती मिराबाई पथरू सोमनकर ह्यांचा नविन सर्व्हे क्रमांक 510 क्षेत्र आराजी 0.28 हेक्टर आर. चा सातबारा कायम करण्यात आला. परंतु श्री आनंदराव गणुजी कांबळे यांचा सातबारा पुनर्मोजणी नुसार तयार करण्यात आला नाही.

ही सर्व चुक भूमी अभिलेख कार्यालयाची आहे. पुनरमोजणीत सोडलेला जुना सर्वे क्रमांक 548/2,549-2 ह्या 7/12 ची मोजणी करून नवीन सर्वे नंबर देऊन नवीन 7/12 बनून द्यावा अश्या आशयाचे पत्र अर्जदाराने भूमी अभिलेख कार्यालयाला केले आहे,

सदर प्रकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता अर्जासोबत मा, खासदार अशोक नेते (चिमूर – गडचिरोली लोकसभा क्षेत्र) यांचे पत्र तथा आमदार देवराव होळी (विधानसभा गडचिरोली क्षेत्र) यांचे पत्र सुद्धा अर्जासोबत जोडल्या गेले आहे. पण त्या अर्जाला कार्यालयाने दाखवली केराची टोपली.

अर्जदाराच्या वयाचा विचार करता कार्यालयाने तात्काळ या गंभीर्यपूर्ण विषयाचा विचार करून शेतकऱ्यास शेतीची मोजणी करून तात्काळ सातबारा उपलब्ध करून देण्याचे गरज होती पण संबंधित प्रकरणात हेतूपरस्पर दुर्लक्ष करून केवळ आर्थिक देवाण-घेवाण करण्याकरीता प्रकरण पूर्ण होत नाही आहे.असे दिसून येते. संबंधित कार्यालयात प्रकरण पुढे ढकलण्याकरिता कर्मचाऱ्यांचे खिसे गरम केल्याशिवाय सदर प्रकरण पुढे जात नाही ही बाब तेवढीच सत्य आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

(जुना सर्वे नंबर 548,549/2/1) (नवीन सर्वे नंबर 510) या सर्वे नंबर ची मोजणी करताना भूमी अभिलेख कार्यालयाने जर इतर शेतकऱ्यांना विचारात घेतले असते तर ही वेळ आलीच नसती,

👆👆👆
( पुनरमोजणीतून हद्दपार झालेला हाच तो सातबारा )

आनंदराव गणुजी कांबळे
शेतकरी
👇👇
मी शेती घेतल्यापासून पटवारी यांचेकडून 7/12 घेऊन माझे कामासाठी वापरायचा पण या ऑनलाइन च्या काळात मी माझा सातबारा घेतला नाही व घेण्यासाठी गेलो असता माझा 7/12 पुनर मोजणीच्या फटक्यामुळे ऑनलाइनला आलाच नाही ही बाब लक्षात आली. कार्यालयाने सकल बाबीची सखोल चौकशी करून माझा जुना सातबारा मोजणी करून नवीन सातबारा साठी मला सहकार्य करावे अथवा लोकशाही मार्गाने मला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल.

नंदा आंबेकर..
उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली
👇👇
सदर शेतकऱ्यांची शेती दि, 5 एप्रिल 2022 ला मोजली आहे पण या मोजणीने इतर शेतकऱ्याच्या क्षेत्रावर परिणाम दिसून येतो,त्यामुळे 548/2 ,549-2 शेतीची मोजणी पुन्हा करण्यात येईल. व मोजणी करिता लागणारा चुना ,मजूर व झेंड्या याचा संपूर्ण खर्च कार्यालय करेल.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button