जाहिरात
कोरचीराजकीय

“आप” ची कोरची तालुका कार्यकारीणी गठीत

Spread the love

गडचिरोली/ कोरची (दि,७ नोव्हेंबर)

आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे कोरची येथे गोटूल सभागृहात जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वात युवा कार्यकर्ते मुकेश नरोटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांचे राजूभाऊ मडावी तर जिल्हा सचिव भास्कर इंगळे यांचें स्वागत मोरेश्वर मसराम यांच्या हस्ते करण्यात आले . पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत नंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक मुकेश नरोटे यांनी केले. उपस्थित प्रमुख अतिथी नी आम आदमी पार्टी दिल्ली आणि पंजाब मध्ये  अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या कामकाजाची माहिती दिली. मोफत विज, दर्जेदार शिक्षण, शुद्ध मुबलक पाणी, चांगल्या आरोग्य सेवा दिल्ली व पंजाब सरकार जर देत असेल तर महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या सेवा सरकार का देत नाही ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. वाढलेली महागाई, बेरोजगारी, कमी करायची असेल तर आज महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात कार्य करण्याची गरज आहे. देशाला नंबर वन बनण्याचे आम आदमी पार्टीचे स्वप्न साकार करण्यासाठी पार्टी कार्यकर्ता गावा गावात जाऊन सर्व सामान्य माणसाला जागवण्याची नितांत गरज आहे असे सुतोवाच करण्यात आले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नियुक्ती पत्र देऊन तालुका कमेटी गठीत करण्यात आली.

(कार्यकारिणी तील मान्यवरांचे स्वागत करताना संयोजक बालकृष्ण सावसाकडे)

कोरची तालुका संयोजक मुकेश नरोटे, तालुका महिला संयोजक अंजना बोगा, तालुका युवा संयोजक बाबुराव मडावी, जेष्ठ नागरिक आघाडीचे श्री प्रभाकर,कराडे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.आरमोरी तालुका संयोजक मोरेश्वर मसराम,संजय चौधरी, योगेश चौधरी, गोविंद तांबेकर, अंजना बोगा, बाबुराव मडावी कार्यक्रमाला उपस्थित होते.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button