शिंदे व भाजपा लुटारू सरकार, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांचा आरोप
बंडखोरी करणाऱ्याची पक्षातून हकालपट्टी नक्कीच,अनेक उमेदवार माघार घेणार
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३० ऑक्टोंबर)
गडचिरोली शहरातील चामोर्शी रोड येथील सेलिब्रेशन फंक्शन हॉलमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार प्रहार करत चांगलाच समाचार घेतलेला आहे.राज्यात महायुती सरकारने बेरोजगारांना, शेतकऱ्यांना चांगलेच वाऱ्यावर सोडलेले आहे अशा या आरक्षण विरोधी सरकारला या निवडणुकीत चांगलाच जनता धडा शिकवणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा कमिशन खाणारी सरकार, दोन लाख बेरोजगारांना स्थगिती दिलेल्या महायुती सरकारला शेवटी स्थगिती उठवून २ लाख बेरोजगारांना महाविकास आघाडी ने नोकरी देण्याचे काम यावेळेस करावे लागले आहे. गृहमंत्री फडणवीस असलेल्या जिल्ह्यात सहा महिन्यात ३५३ महिलावर अत्याचार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे किमान १७५ ते १८० उमेदवार निवडून येऊन सरकार महाविकास आघाडीचीच बनेल तथा विदर्भामध्ये ४५ पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास सुद्धा बोलून दाखविला.
बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्यास पक्षातून बडतर्फ करणार
¶¶¶
काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार पक्षाच्या मेळाव्यानिमित्त गडचिरोलीत आले असताना त्यांना बंडखोरी करून अपक्ष नामांकन दाखल करणाऱ्या विषयी विचारले असता ते म्हणाले, कुणीही बंडखोरी करणार नाही. यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. तरीही बंडखोरी केल्यास त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात येईल, त्यामुळे ४ नोव्हेंबरला कोण-कोण आपले अर्ज माघे घेणार याकडे लक्ष लागले आहे.
पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, गडचिरोली- लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेवर किरसान, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार मनोहर पोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य राम मेश्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, रजनीकांत मोठघरे, हसन गिलानी, प्रभाकर वासेकर, राजेश कात्रठवार, समशेर खार पठाण, मलिक बुधवानी, प्रशांत थोरात, यांचे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
