जाहिरात
विधानसभा गडचिरोली

भव्य रॅली काढून काँग्रेस-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर पा. पोरेटी यांचा नामांकन अर्ज दाखल

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२९ ऑक्टोंबर)

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्राकरिता कॉंग्रेस-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर पा.पोरेटी यांचा आज दि. २९ आक्टोंबर रोज मंगळवारी नामांकन अर्ज दाखल करण्यात आला.

चामोर्शी रोडवरील कात्रटवार कॉम्प्लेक्स येथुन निघालेल्या प्रचंड जनसमुदायाच्या महारँलीत सहभागी पदाधिकारी व कार्यकर्ता गण काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर पा.पोरेटी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांना विजयासाठी शुभेच्छा देत होते.

रॅलीत माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरड्डीवर,काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष राम मेश्राम, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, काँग्रेस शहराध्यक्ष सतीश विधाते,काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कविता मोगरकर,माजी नगरसेवक नंदू कायरकर, राजू कात्रटवार, सुनील डोगरा,अतुल मल्लेवार प्रदेश सचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य, कुणाल पेंदोरकर प्रदेश सहसचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश,मनोज ढोरे प्रदेश सरचिटणीस ओबीसी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश
तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस-महाविकास आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button