विधानसभा गडचिरोली
गडचिरोली: विश्वजीत मारोतराव कोवासे अपक्ष लढाई लढणार

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२८ ऑक्टोंबर)
विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत ६८-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात विश्वजीत मारोतराव कोवासे यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी नाकारल्यानंतर ते अपक्ष उमेदवार म्हणून आपली लढाई लढणार असल्याची माहिती लोकशाही न्यूज ला दिली आहे.
उद्या दिनांक २९ ऑक्टोबरला नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला नामांकन अर्ज सादर करणार आहेत.
विश्वजीत मारोतराव कोवासे हे उद्या नामांकन अर्ज भरण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन करतात की काही निवडक कार्यकर्त्याच्या मदतीने आपला नामांकन अर्ज भरतात हे सुद्धा पाहणे तितक्याच महत्वाचे आहे.
जाहिरात
