जाहिरात
आपला जिल्हापत्रकार परिषद

गडचिरोली : स्मशानभूमी चा राखीव ७/१२ महिलेच्या नावावर

विसापूर ग्रामस्थांची पत्रकार परिषद

Spread the love

लोकशाही न्यूज, गडचिरोली (दि. ४ जुलै)

गडचिरोली नगर परिषद हद्दीत असणाऱ्या मौजा विसापूर येथे भुमापन क्रमांक ३३३ आराजी १.२० हेक्टर आर. ही जागा बंदोबस्त ७/१२ नुसार दि. १७/८/२०२१ पूर्वी शेतीचे स्थानिक नाव झुडूपी जंगल सरकार या नावाने नमूद आहे. जी जमीन स्मशानभूमी करिता राखीव असल्याची नोंद आहे.परंतु दि.२३/६/२०२५ रोजी सदर जागेचा ७/१२ तपासला असता सदर जागेच्या गाव नमुना ७ मधुन झुडूपी जंगल सरकार ची नोंद हटविण्यात आलेली आहे. तसेच कुळ, खंड व इतर अधिकार मधील स्मशानभूमी याची नोंद वगळुन त्या जागेवर श्रीमती कमलबाई दादाजी खेवले या नावाची नोंद दर्ज केली आहे.

कमलबाई दादाजी खेवले या नावाने सदर जमीन मंजुरी आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा विसापूर ग्रामस्थ १५ ऑगस्ट या तारखे पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती आज (दि. ४ जुलै) झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

पत्रकार परिषदेला भास्कर कोटगले माजी सरपंच, महादेव भोयर माजी नगरसेवक, केशव निंबोड माजी नगरसेवक, राजेशवर भोयर वन हक्क समिती अध्यक्ष विसापूर, टिकाराम भोयर, नामदेव बानबले, तात्याजी म्हशाखेत्री, वासुदेव पाल, मनोहर जवादे, उद्धवराव कोटगले, मधुकर येवले यांचे सह विसापूर ग्राम वासिय हजर होते.

सदर महिलेच्या घरातील कुणीही व्यक्ती माजी सैनिक नाही, सदर महिला ही भूमिहीन नसून याच जागेलगत असलेली स्वतःच्या मालकीची जमीन दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली आहे. सदर महिलेच्या नावाने आज अमिर्झा येथे शेत जमीन आहे. ती महिला शेत मजूर म्हणुन काम करीत नाही.

सदर जागेच्या ७/१२ वर सरकार झुडूपी जंगल असा शेरा असताना स्थानिक वनहक्क समिती चा ठराव नसताना सदर जमीन खाजगी व्यक्तीच्या नावाने मंजूर करण्यात आली. अभिलेख ७/१२ कमलबाई खेवले यांच्या नावाने बनविण्यात आला यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विसापूर ग्रामस्थांनी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button