
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१८ सप्टेंबर)
गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार जयश्रीताई जराते यांच्या प्रचार – प्रसाराचे धोरण ठरविण्यासाठी वसा – पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पोर्ला येथे शनिवार दिनांक २१ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या रस्ते/ महामार्ग बाधित शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांच्या हस्ते या कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सहउद्घाटक म्हणून जयश्रीताई जराते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेकापच्या राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहनराव गुंड, अध्यक्ष म्हणून शेकाप आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून भाई शामसुंदर उराडे (मध्यवर्ती समिती सदस्य), भाई संजय दुधबळे (जिल्हा समिती सदस्य), डॉ. गुरुदास सेमस्कर (जिल्हा समिती सदस्य), भाई तुळशिदासजी भैसारे (जिल्हा समिती सदस्य), भाई क्रिष्णा नैताम (जिल्हा समिती सदस्य), कविता ठाकरे (जिल्हाध्यक्ष महिला आघाडी) यांचे सह या मेळाव्याला अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
