जाहिरात
गडचिरोली

१० डिसेंबरला संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम

श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रमाची आढावा बैठक पार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२९ नोव्हेंबर)

श्री संत संताजी जगनाडे स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली येथे दि. २८ नोव्हेंबर ला प्रतिष्ठानच्या सभागृहात पदाधिकारी व सदस्यांची व उपस्थित मान्यवरांची सभा आयोजित करण्यात आली. १० डिसेंबर रोजी श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यासाठी बैठक पार पडली.

१० डिसेंबरला संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त शहरात रॅली
¶¶¶
गडचिरोली येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंतीचा कार्यक्रम दिनांक १० डिसेंबर रोज मंगळवार ला संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोलीच्या सभागृहात घेण्याचे ठरले. १० डिसेंबरला सकाळी ९ वाजता प्रतिष्ठाच्या कार्यालयातून वंजारी मोहला – बेसिक शाळा – हनुमान वॉर्ड – सराफा लाईन – पटेल सायकल स्टोअर – रामपुरी वॉर्ड ते परत संताजी प्रतिष्ठान असा राहणार आहे.

रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व महिला हिरवी साडी परिधान करून त्यांच्या डोक्यावर कलश असेल. तर पुरुष पांढरा शर्ट परिधान करून डोक्यावर जय संताजीच्या नावाची शुभ्र टोपी राहील.

(श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती उत्साहात साजरी व्हावी याकरिता आढावा बैठकीला हजर पदाधिकारी व सदस्यगण)

त्यानंतर प्रतिष्ठान कार्यालयात कीर्तनाचा कार्यक्रम होईल. समाज बांधवाना स्नेहभोजन होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. बैठकीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर वासेकर, सचिव सुरेश भांडेकर, उपाध्यक्ष विष्णु कांबळे, संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा.देवानंद कामडी, देवाजी सोनटक्के, सुधाकर लाकडे, प्रफुल्ल आंबोरकर, यांचेसह तेली समाजातील अनेक महिला इत्यादी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button