साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न, दर्शनासाठी उसळला जनसागर
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३० मार्च)
गडचिरोली शहरातील चामोर्शी महामार्गावर धन्वंतरी हॉस्पिटलच्या मागे जुन्या साई मंदिराच्या जागेवर नवनिर्मित मंदिरामध्ये अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा चैत्र शुद्ध नवमी रोज गुरुवार दिनांक ३० मार्च २०२३ ला सकाळी १० वाजता झाली.
विष्णू कांबळे व सिंधू कांबळे दाम्पत्य यांच्या शुभ हस्ते साई बाबा मूर्तीची जलाभिषेक ,पूजा अर्चा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली त्यानंतर आरती करण्यात आली.

(कांबळे दांपत्याच्या मदतीने झाला मंदिराचा जीर्णोद्धार)
आई वडिलांच्या स्वप्नाला दिला आकार ¶¶¶¶¶¶¶
४० वर्षांपूर्वी म्हणजे गडचिरोली जिल्हा निर्मिती झाली त्यावर्षी गडचिरोली शहरातील प्रथम साई मंदिर बांधण्यात आला तो साई मंदिर आता जुना व पडीक झाल्याने त्या साई मंदिराचा जीर्णोद्धार करून नवनिर्मित बांधलेल्या वास्तूमध्ये स्व.मनिराम कांबळे व स्व. आनंदाबाई कांबळे यांच्या स्मृती पित्यर्थ साई बाबा मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या साई मंदिरास भेटी
¶¶¶¶¶
गडचिरोली शहरातील विविध राजकीय क्षेत्रात काम करणारे तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती यांची साई दरबारी दर्शनासाठी प्रामुख्याने हजेरी होती .
साईबाबा मंदिर परिसरात पंढरीचा पांडुरंग, श्री शेगाव नगरीचा गजानन महाराज यांची सुद्धा प्रतिमा दर्शनासाठी लोकांना ठेवली आहे .

