जाहिरात
चामोर्शी

पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडली १७ लाख ८१ हजार ६०० रुपयाची ची दारु

Spread the love

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि,३० मार्च)

दि. २९ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे मिळालेल्या गोपनीय – माहितीच्या आधारावर चामोशी हद्दीतील दारू तस्कर शंकर अन्ना हा त्याचे सहका-यांच्या मार्फतीने चंद्रपुर जिल्हयातून मोठया प्रमाणात दारुची खेप आणणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी हरणघाट मार्गावर रात्रीदरम्यान सापळा रचून नाकाबंदी लावली असता दारुचे वाहतुक करीत असलेल्या पिक अप वॅनने पोलीसांच्या इशा-यास न जुमानता बेरिकेटस तोडून पळ काढला परंतु पोलीसांनी क्षणाचा विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला.

अवैध दारु वाहतुक करीत असलेल्या वाहन चालकाने कारवाई टाळण्याकरीता त्याचे ताब्यातील वाहन जंगल मार्गाने तसेच पोस्टे चामोशी व पोस्टे आष्टी येथील वेगवेगळ्या गावात नेले. परंतु पोलीसांनी १०० ते १२५ किमी सतत पाठलाग केल्याने वाहनचालक व त्याच्या साथीदाराने वाहन पोस्टे चामोर्शी हद्दीतील सोनापूर या गावाजवळ सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून वाहन चालका सोबत असलेल्या अमित बारई रा. गौरीपुर ता. चामोशी यांस ताब्यात घेतले परंतु वाहनचालक राकेश मशीद रा. गौरीपुर ता. चामोशी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.

(पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल व वाहन )

घटना स्थळावरून देशी दारुच्या १३९ पेट्या व विदेशी दारुच्या ५ पेटया दिसुन आल्याने पोलीसांनी सदर दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले पिकअप वाहन असे १७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केला.

घटनेत सापडलेल्या आरोपी विरुद्ध कलम ३५३ नादंवि सहकलम ६५ (अ) १२८(२), ८३ मदाका सहकलम १८४ मोवाका अन्वये आरोपी नामे शंकर अन्ना रॉय, राकेश मशीद व अमीत बारई यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करुन आरोपी नामे अमीत चारई यांस अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे मा. व अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि, राहूल आव्हाड, पोउपनि दिपक कुंभारे, अकबर पोयाम, प्रशांत गरफडे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, मंगेश राऊत, सुनिल पुलावार, सचिन घुबडे, चान मनोहर पेलन, शगीर शेख यांनी केलेली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button