जाहिरात
गंगाखेडपरभणी

गंगाखेड परभणी मार्गावर महातपूरी फाट्यावर बस व ऑटोची समोरासमोर धडक,22 जण जखमी

नशीब बलवत्तर म्हणून ऑटो चालक बचावला

Spread the love

देवराव जंगले, गंगाखेड प्रतिनिधी (दि,२० सप्टेंबर)

गंगाखेड परभणी राज्य महामार्गावर गंगाखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या महातपुरी फाट्याजवळ कळमनुरी लातूर एम एच 14 BT1523 ही बस परभणी वरून गंगाखेडला येत असताना महातपुरी याठिकाणी समोरून येणाऱ्या ऑटो क्रमांक एम.एच.22 एफ 2268 व बसची समोरासमोर धडक झाल्याने बस मधील एकूण 22 प्रवासी जखमी झाले, तर ऑटो चालक याचे नशीब बलवत्तर असल्याने बस खाली ऑटो जाऊन देखील बचावला आहे.

हा अपघात दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार च्या सुमारास महातपुरी फाट्यावर घडला आहे. लातूरकडे जात असताना महातपुरी फाट्यावर रियर ऑटो चालक गंगाखेड शहरातुन शेतातील महिला आणण्यासाठी शेताकडे निघाला असताना अपघात झाला.
या अपघातात ऑटोचा चेंदामेंदा झाला असून ऑटो चालक गोविंद महादराव शिंदे वय 22 वर्षे हा चालक बचावला आहे.


(छायाचित्रात जेसिबी च्या साहाय्याने एस टी ला बाजूला करून ऑटो चालकाला बाहेर काढताना)

आटो चालक गोविंद शिंदे राहणार धनगर गल्ली गंगाखेड याचे नशीब बलवत्तर आहे. बस ऑटो वर पूर्ण पणे वर चढली होती ऑटो पूर्ण चेंदामेंदा झाला असताना ही स्थानिक नागरिकांनी व पोलीस अधिकारी/ कर्मचारी यांच्या मदतीने जेसीबीच्या साह्याने बस ऑटो वरून हटवून ऑटो मध्ये असलेल्या चालक गोविंद शिंदे याला नागरिकाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले.
या बसमधील जखमी मध्ये संजय मारुती कानबाले वय 40 वर्ष राहणार बोरी तालुका, जिल्हा हिंगोली, नागेश गंगाधर दोरे वय 29 वर्ष राहणार सांगवी जिल्हा हिंगोली, संना शेख सलीम वय 25 वर्ष राहणार कुरुंदा तालुका वसमत, लक्ष्मीकांत चिंतामण सिसोदे वय 50 वर्ष राहणार इंदेवाडी परभणी, अंकुश पारवे वय 55 वर्ष राहणार ईजेगाव, अनुराज बचाटे वय 50 वर्ष राहणार धामणी, हनुमान राघोजी कुरूडे वय 36 वर्ष राहणार कवडा तालुका कळमनुरी, दिगंबर मारोतराव घोगरे वय 55 वर्ष राहणार सुपा ता. गंगाखेड जिल्हा परभणी, गणेश गोविंदराव मोटे वय 44 राहणार सावंगी जि. हिंगोली, मालन रसूल शेख वय 55 वर्ष राहणार ममता कॉलनी गंगाखेड, नुरजा बेगम खाजा बेग वय 40 वर्षे राहणार राजमोहला गंगाखेड, गुलनाज बेगम खाजा बेग वय 22 वर्ष राहणार राजमोहला गंगाखेड, शेख अतिक शेख अंनिस वय 12 वर्ष राहणार राजमोहला गंगाखेड, शहनाज मिर्झा खान बेग वय 21 वर्षे राहणार गंगाखेड, माजित खान वय 41 वर्ष राहणार दैठणा, सोपान दिगंबर हूरगुळे वय 58 वर्षे राहणार गंगाखेड, सखाराम बाजीराव जाधव वय 82 वर्षे उकडगाव, वामनराव कराळे वय 70 वर्ष राहणार गोंडगाव या जखमीना उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे दाखल केले असता सर्व 22 जखमी प्रवाशांवर डॉ. केशव मुंडे डॉ. स्वाती मुंडे ,बडे मामा ,संगीता लटपटे ,कौशल्या हजारे यांनी तात्काळ उपचार केला.
सोनपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश वाघमारे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी मदत करत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती.
घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन मदत करण्यासाठी जेसीबी मालक सय्यद जहीर यांनी तात्काळ जेसीबी उपलब्ध करून दिले बस ऑटोच्या वरून काढण्यासाठी शेख खलिल, शेख गौस सर, शेख शकील, पप्पू म्हात्रे, शेख करीम, विलास खटिंग, उद्धव शिंदे, शेख सरदार,अजहर पठाण, भैया चाऊस, शेख जमील महातपुरीचे सरपंच प्रदीप शिंदे व पोलीस अधिकारी पी.एस.आय. संदीप गडदे,पि.एस.आय.बुधवडकर,ऐ एस. आय.टि.टी.शिंन्दे,राजु परसोडे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, इत्यादींनी मदत केली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button