जाहिरात
राजकीय

महिला सशक्तीकरणाचा सरकारचा उपक्रम अभिनंदनीय,आमदार डॉ देवराव होळी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि, ४ डिसेंबर)

अमीर्झा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळाव्याचे केले उद्घाघाटन

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिलांना ३३% आरक्षण देण्याचा अभूतपूर्व कायदा करून व राज्यातील शिंदे, फडणवीस, पवार यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने शक्ती कायद्याच्या माध्यमातून नारीशक्तीचे सशक्तिकरण करण्याचा केलेला मोठा प्रयत्न व संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळाव्याचे आयोजन हे खरोखरच अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांनी अमीर्झा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी मंचावर गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी साळुंखे ,तहसीलदार महेंद्र गणवीर, गटशिक्षणाधिकारी परसा मॅडम, स. प्र .अधिकारी पोरद्दिवार, डॉ. साळवे तालुका आरोग्य अधिकारी,सोनाली नागपुरे सरपंच अमिर्झा, रंजीता पेंदाम सरपंच मौशिखांब ,सरिता टेंभुर्णे सरपंच आंबेशिवणी डॉ. नरोटे तालुका कृषी अधिकारी ,नायब तहसीलदार चाकुलवारजी ,तलांडे, ठाकरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मंचावर उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button