जाहिरात
ब्रेकिंग न्युज

अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांचा ९ डिसेंबरचा गडचिरोली दौरा रद्द, खासदार अशोक नेते यांची माहिती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि.६ डिसेंबर)

गडचिरोली जिल्ह्यातील ९ डिसेंबर २०२३ रोजी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा गडचिरोली दौरा होता पंरतु काही महत्वाच्या कारणास्तव गडचिरोली दौरा हा पुढे ढकलून आयोजित कार्यक्रम हा समोरील तारखेत घेण्यात येईल अशी माहिती खासदार अशोक नेते गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र यांनी दिली आहे.

.(खासदार अशोक नेते गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ९ डिसेंबर चा दौरा रद्द होऊन पुढे ढकलण्याची माहिती देताना)

जिल्ह्यातील अनेक विविध विकास कामांचे व प्रकल्प प्रोजेक्टचे भुमिपुजन, कोनसरी येथील प्रोजेक्ट प्रकल्पाचे व वडसा-गडचिरोली रेल्वे लाईन चा भुमिपुजन, चिचडोह बँरेजेस प्रकल्पाचे लोकार्पण समारंभ इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन होते.पंरतु दौरा कार्यक्रम हा पुढे ढकलून समोरील तारखेत कळविण्यात येईल.

असे खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथील कार्यालयातून माहिती दिली.तरी याची नोंद भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी घ्यावी अशी विनंती केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button