जाहिरात
आपला जिल्हा

जि. प. समोर अंगणवाडी महिलांचे बेमुदत संप

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि,४ डिसेंम्बर)

अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांला घेउन अंगणवाडी कृती समितीच्या वतीने ४ डिसेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. राज्यातील दोन लाख अंगणवाडी महिला या संपात सहभागी होणार आहेत, अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा दया, तो पर्यंत किमान वेतन २६००० रुपये देण्यात यावे, आश्वासन दिल्या नुसार अंगणवाडी महिलाना मानधनाने निम्मे पेंशन तथा मॅज्युटी देण्यात यावी. या प्रमुख मागणीला घेउन बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

या निमित्ताने जिल्हा परीषदे समोर संघटनेच्या वतीने धरणा देण्यात आला. एक हजाराहून जास्त अंगणवाडी महिला या धरणा कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. संघर्ष हमारा नारा है भावी इतिहास हमारा है अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहीजे, अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहीजे, अंगणवाडी महिलांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये मिळालेच पाहीजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करुन अंगणवाडी महिलांना अॅज्युटी लागू करा, मानधनाचे निम्मे पेंशन मिळालेच पाहीजे, आदि घोषणा देण्यात आल्या.

मार्गदर्शनपर भाषणात प्रा. दहीवडे म्हणाले जनतेने निवडून दिलेल्या आमदार खासदाराच्या भविष्याचा विचार करुन त्यांना पेंशन दिली जाते. तर हेच आमदार जनतेच्या भविष्याचा विचार का करीत नाही. केवळ आश्वासन देतात परंतु त्यांची अंमलबजावणी केल्या जात नाही. पेंशन तथा अॅज्युटी देण्यात येईल असे आश्वासन विधान सभेत देण्यात आले आठ महिण्याचा कार्यकाल लोटण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणी झाली पाहीजे याच मागणीला घेउन हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. अमोल मारकवार म्हणाले कामगाराला संघर्षा शिवाय काहीच मिळत नाही.. देशात लोकशाही असली तरी या लोकशाहीचे भांडवलशाहीत रुपांतर झाले आहे. आणि म्हणूनच गरीब दिवसे न दिवस गरीब होतांना पहावयास मिळते तर भांडवलदार अती श्रीमंत होत आहे. गोरगरीब जनतेवरील अन्याय सतत वाढत आहे. आणी अन्यायाचा विरोध केला तर तो दुर करण्याऐवजी सरकारची दडपशाही दिवसें दिवस वाढत आहे. या दडपशाहीचा आपण प्रतिकार केला पाहीजे. प्रमोद गोडघाटे, अरुण बेलके, राजेश पिंजरकर यांचे ही मार्गदर्शनपर भाषणे झाली, उज्वला उंदीरवाडे यांचे आभार प्रदर्शन केले.

धरणा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता भारती रामटेके, कौशल्या गौरकार, ज्योती बेंजकीवार, छाया कागदेलवार, सुशिला कार, सुनंदा बाखणे, सुमन तोकलवार, सुनंदा उईके, योगीता मुनघाटे, आदींचा सहभाग होता.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button