जाहिरात
ताज्या घडामोडी

३१ जुलै पासून सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांच्या चौकशी साठी बेमुदत ठिय्या आंदोलन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२४ जुलै)

सार्वजनिक बांधकाम विभागातील क्र १ व क्र २ अंतर्गत रस्त्याचे कामे व इतर विविध कामे सुरु आहेत, चुकीच्या मार्गाने सोसायटी ला टक्केवारी घेऊन बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंते यांचे संगनमताने कामे दिले जात आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी या मागणी साठी योगाजी कुडवे
आदर्श विकास समाज सेवा संस्था हे दि,३१ जुलै पासून अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालय समोर आंदोलन करीत असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

सोसायटी ला नियमबाह्य काम देऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे सोसायटी कामे न करता कंत्राटदारांना कामे विकतात मग सोसायटी ला कामे देण्याचे कारण काय? काही अभियंते पहिले सोसायटी वर कामे करून घेतात नंतर नव्याने निविदा काढुन नव्याने देयके देतात यात साखळी पद्धतीचा भ्रष्टाचार सुरु आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी.भ्रष्ट अधिकारी यांचे वर तात्काळ निलंबनाची कारवाही करावी या मागणी साठी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली कार्यालया समोर दि,३१ जुलै पासून बेमुदत ठिया आंदोलन करीत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button