
गडचिरोली/कुरखेडा (दि,१७ सप्टेंबर)
छत्तीसगड राज्यातून आलेल्या हत्तीच्या कळपाने जिल्हयात मागील महिण्यात प्रवेश केला होता. दरम्यान काही दिवसांपासून हत्तींचा कळप कुरखेडा तालुक्यातील जंगल परिसरात बस्तान मांडूण आहे. आज १७ सप्टेंबर रोजी तालुक्यातील घाटी या गावालगतच्या कुरखेडा वैरागड या मुख्य मार्गावरुन १०० ते २०० मीटर अंतरावरील जंगल परिसरात हत्तीने इसमावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ज्ञानेश्वर शामराव गहाणे वय (४५) रा. कुंबीटोला ता. कुरखेडा जि. गडचिरोली असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.
सदर इसमाला कुरखेडा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
हत्तीच्या कळपाने अनेक दिवसांपासून कुरखेडा तालुक्यातील जंगल परिसरात बस्ताण मांडले आहे. यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आज १७ सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वर शामराव गव्हाणे हे जबर जखमी आहेत, घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली आहे. हत्तीचा कळप कुरखेडा – वैरागड मार्गावर असलेल्या घाटी जंगल परिससात पोहचल्याने अवागमण करणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
