“आप” चा वाढीव करवाढीला विरोध. उपमुख्याधिकाऱ्याला दिले निवेदन
गडचिरोली (दि,१ डिसेंम्बर)
गडचिरोली नगर परिषद ने सुधारित कर मुल्य संदर्भात सर्वेक्षण सन २०२३ ते २०२७ पर्यंत प्रस्तावित पंचवार्षिक कर मूल्यांकन नोटीस (सूचना) नगर परिषद हद्दीतील जनतेला नोटीस देण्यात आले आहे आक्षेप नोंदविण्याची तारिख १८ डिसेंबर २०२२ मुदत आहे आम आदमी पार्टी गडचिरोली वतीने नगर परिषद कार्यालयाने काही नागरिक घरी नसतानाही भरमसाठ कर आकारणी करण्यात आले आहे ,नगर परिषद अंतर्गत इंग्रजी माध्यमाचे व दर्जेदार शिक्षण नसताना भरमसाठ शिक्षण कर आकारणे, नगर परिषद अंतर्गत कोणतीही आरोग्य सुविधा नसताना आरोग्य व उपयोगिता कर आकारणे, गडचिरोली शहरभर सर्वत्र धुळीचे प्रदूषण वर उपयोजना करून प्रदूषण कमी करणे,शहरात पुरेशी वृक्ष लागवड नसतानाही वृक्ष कर कमी करणे तसेच इंदिरा गांधी चौक गडचिरोली ते चामोर्शी रोडवरील विद्युत पोलचे लाईट बंद असणे आदी मागण्याचे निवेदन सादर करून उपमुख्याधिकारी रविंद्र भांडारवार नगर परिषद गडचिरोली यांचे सोबत आम आदमी पक्षाचे जिल्हा संयोजक श्री बाळकृष्ण सावसाकडे यांनी सविस्तर चर्चा केली १७ डिसेंबर २०२२ पर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आप जिल्हा संयोजक श्री बाळकृष्ण सावसाकडे यांनी दिले आहे .

निवेदन सादर करताना जिल्हा सचिव भास्कर इंगळे,जिल्हा कोषाध्यक्ष संजय जिवतोडे, महिला जिल्हा संयोजक मीनाक्षी खरवडे, जिल्हा युवा महिला सहसंयोजक सोनल ननावरे,शहर संघटनमंत्री हितेंद्र गेडाम आदी उपस्थित होते.
