
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,११ जुलै)
आजपर्यंत ६६८ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर केले आत्मसमर्पण
दि.११ जूलै २०२४ ला दोन जहाल महिला नाव १) प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टिम/स्टाफ टिम, वय ३६ वर्ष, रा. बोगाटोला (गजामेंढी), ता. धानोरा, जि. गडचिरोली व २) अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टिम/स्टाफ टिम, वय ३४ वर्षे, रा. मरकेगाव ता. धानोरा, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
१)आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्य प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई या सन २००५ पासून मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर भरती होवून सन २०११ पर्यंत कार्यरत होत्या, सन २०१४-१५ मध्ये केकेडी (कुरखेडा, कोरची, देवरी) दलममध्ये कार्यरत,सन २०१५ मध्ये कंपनी नं. ४ मध्ये बदली होऊन सन २०१८ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत, सन २०१८ मध्ये कंपनी नं. ४ मध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) म्हणून बढती होऊन सन २०२२ पर्यंत कार्यरत होत्या तिच्यावर आजपर्यंत एकुण ४० गुन्हे दाखल असून त्यामध्ये २० चकमक, २ जाळपोळ, व १८-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
२) अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती सन २०१० मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०१३ पर्यंत कार्यरत,सन २०१३-१४ मध्ये प्लाटुन नं.१५ मध्ये सदस्य पदावर कार्यरत.
सन २०१५ मध्ये डीके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत.सन २०१८ मध्ये डीके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) पदावर बढती होऊन आजपावेतो कार्यरत.तिच्यावर आजपर्यंत एकुण ७ गुन्हे दाखल असून त्यामध्ये २ चकमक,४ खून, व १ इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
