जाहिरात
आपला जिल्हा

१० जुलै ला गोंडवाना विद्यापीठात रोजगार व स्वयंरोजगार मेळावा

जिल्ह्यातील उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि.९ जुलै)

गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या तसेच विविध महामंडळे उपस्थित असणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी स्वत:चा बायोडाटा, आधारकार्ड तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रासह गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहून पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button