“आप” पार्टीच्या जन संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१९ फेब्रुवारी)
गडचिरोली येथील आम आदमी पार्टी जिल्हा जन संपर्क कार्यालय कॅम्प एरिया येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात करण्यात आले, तसेच राज्य गीत सादर केले व आगामी गडचिरोली नगर परिषद संदर्भात कार्यकर्त्या सोबत प्रभाग समित्या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

त्यावेळी दिवाकर साखरे सेवानिवृत्त सहायक अधिक्षक जिल्हा न्यायालय गडचिरोली यांचा टोपी घालून पक्ष प्रवेश घेण्यात आला .
या कार्यक्रमा प्रंसगी खालील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा सचिव भास्कर इंगळे, जिल्हा शहर समीती सचिव संतोष कोटकर, जिल्हा कोषाध्यक्ष संजिव जिवतोडे,महीला शहर संयोजक समीता गेडाम, जिल्हा महीला संयोजक मीनाक्षी खरवडे,रुपेश सावसाकडे,महीला युवा संयोजक सोनल नन्नावरे,शहर संयोजक नामदेव पोले, जिल्हा महिला सह. संयोजक अलका गजबे, गणेश त्रिमुखे, इत्यादी कार्यकर्ता हजर होते. तसेच “जय जय महाराष्ट्र माझा” राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
