जाहिरात
विशेष

सरकारी स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट मक्याचे वाटप

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१४ जुलै)

सरकारी स्वस्त धान्य दुकानातून माहे जुलै २०२३ या महिन्यामधे निकृष्ट मक्याचे वाटप सुरू आहे. कोणताही लाभार्थी हा मका खाऊ शकणार नाही. इतका खराब मका कार्डधारकांना दिल्या जात आहे ही खरच चिंतेची बाब आहे. कार्डवर गहू मिळत असतांना सुद्धा ते वितरणासाठी आलेच नाही. येणारच नाहीत असे ग्राहकांना सांगून संपूर्ण मका खपविल्या जात आहे.

पुरवठा विभागाकडून माहे जुलै 2023 ला होणाऱ्या वितरणा संदर्भात आलेला संदेश ¶¶¶¶¶

वास्तविक पुरवठा विभागा कडून मोबाइलवर धान्य वाटप बाबतीत संदेश आला.आपल्याला माहे जुलै, २०२३ करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे RCID-272001928389, गहू ६ कि. ग्रॅ., तांदूळ कि.ग्रॅ., साखर ० कि.ग्रॅ., मका ६ कि.ग्रॅ., ज्वारी ० कि.ग्रॅ., बाजरी ० कि.ग्रॅ., नाचणी ० कि.ग्रॅ., फोर्टिफाइड तांदूळ १८ कि.ग्रॅ. अन्नधान्य भारत सरकारच्या निर्णयानुसार निःशुल्क /मोफत अनुज्ञेय आहे. धान्य घेतल्याची पावती आवश्य घ्यावी, तक्रार व सूचना साठी पीडीएस हेल्पलाइन क्र. १८००२२४९५० व १९६७ सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.

हा सर्व प्रकार घडत असूनही सबंधित शासकीय अधिकारी डोळे बंद करून आहेत, दक्षता समित्या बघ्याची भूमिका घेऊन शांत बसले आहेत. मग आमचा गरीब रेशन धारक काय करील बिचारा जे भेटते ते घेऊन जानार, चुपचाप गोटे माती कचरा भरलेले धान्य खाणे कदाचित बिचाऱ्याच्या नशिबातच असेल ? या अशा परिस्थितीत कार्डधारकांनी कुठे जावे. कोणासमोर बोलावे हा मोठा प्रश्न आहे.

तिकडे कोणी हा सडला मका खात नसल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना मूर्ख समजून त्यांना जबरदस्तीने असे धान्य चारले जात आहे. अशा खराब मकाचे कार्डधारक काय करणार ते सांगा? मोफत धान्य मिळते म्हणून शासनाने सडके खराब धान्य कार्ड धारकांच्या माथ्यावर का मारावे? हे अजिबात योग्य नाही. जिथे जनावर सुद्धा असा खराब धान्य खातांना ४ वेळा विचार करेल, तर माणसाने विचार का करू नये. ?

जिल्ह्यात पुरवठा अधिकारी आहेत ते काय करतात. निरीक्षक आहेत ते काय करतात? आपण या सर्व धान्याची चौकशी करून तात्काळ खराब मका वाटप करणे बंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

श्री,बरडेवाळ
तालुका पुरवठा निरीक्षक गडचिरोली
¶¶¶¶
गोडाऊन ला आलेला माल स्वस्त धान्य दुकानात पाटविण्यापूर्वी तपासला जातो,सगळेच पोते तपासून पाहणे शक्य नसल्याने ज्या पोत्यात मक्का निकृष्ट असेल तर तो नक्कीच बदलून दिला जाईल .

किशोर खोबरागडे,लाभार्थी ¶¶¶

वारंवार स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा माल वाटपासाठी येतो याचा अर्थ नेमका ग्राहकाने समजायचा तरी काय,  जिल्हा पुरवठा निरीक्षक व तालुका पुरवठा निरीक्षक याची कुठलीही जबाबदारी घेत नसतील तर जनतेने  स्वस्त धान्य दुकानातून वाटप होणारा निकृष्ट दर्जाचा धान्य खायचा का असा सवाल प्रशासनाला केला आहे.

 

 

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button