बलात्काऱ्यास २५ वर्ष कारावास व १ लाख रुपये दंड

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,९ मे)
गडचिरोली पोलीस हद्दीतील गोकुलनगर येथे दि. २७/०१/२०२० रोजी पीडीत मुलगी वय १५ वर्षे ही नातेवाईकाच्या घरी जेवायला गेली असता, पिडीत मुलीचे नातेवाईक आरोपी शंकर सुधाकर टिंगुसले वय ३४ वर्षे रा. विकेकानंद नगर, गडचिरोली याने पिडीतेला सायंकाळी ६ वा दरम्यान मच्छी आणायला बाजारात जाऊ म्हणून फुस लावली व बाजारातुन परत येत असतांना कामगार सोसायटी गोकुलनगरच्या मागे पीडीतेस झाडाझुडपात जोर जबरदस्तीने नेऊन जोर जबरदस्तीने शारिरीक संबंध केले,
आरोपी वारंवार त्या मुलीवर शारीरिक संबंध ठेऊन बलात्कार करीत राहिला काही दिवसांनी पिडीत मुलगी ही गर्भवती आढळून आल्याने त्या मुलीच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
फियादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे गडचिरोली येथे दि. ०५/०१/२०२० ला अप.क्र. ४०१/२०२० अन्वये कलम ३७६ (२) (एफ), (आय), (जे), ३७६ (३), ५०६ भादवी तसेच सहकलम ४,५,६, बाल लैंगीक अत्याचार अधिनियम २०१२, कायदद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस दिनांक ०६/०९/२०२० रोजी अटक करून, तपास पूर्ण करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. ८६/२०२० नुसार खटला मा. सत्र न्यायालयात चालवून फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून दिनांक ०९/०५/२०२४ रोजी आरोपी शंकर सुधाकर टिंगुसले वय ३४ वर्षे रा. विकेकानंदनगर, गडचिरोली यास मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उत्तम एम. मुधोळकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम ३७६ भादवी, सहकलम ४.६ बाल लैंगीक अत्याचार अधिनियम २०१२ मध्ये दोषी ठरवुन २० वर्षे सश्रम कारावास व ७५ हजार रूपये दंडाची शिक्षा, कलम ५०६ भादवी मध्ये दोषी ठरवुन ०५ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला.
पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास म. सहा. पोलिस निरीक्षक पुनम प्रकाश गोरे पोस्टे गडचिरोली यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.
