जाहिरात
भ्रष्टाचार

वेंगनूर येथे “त्या” साडेसात लक्ष रुपयाची झाली चौकशी, आता कार्यवाही कडे लागले लक्ष

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली/मुलचेरा (दि,१३ मे)  जिल्ह्यात आदिवासी बहुल मुलचेरा तालुका मुख्यालयापासून अंदाजे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या वेंगनूर येथे सुरु असलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या नवीन बांधकामाचे काम सुरु असून सदर कामामध्ये ७,४९,५२५ रुपयाचे विद्युत जोडणीचे काम सुद्धा मंजूर करण्यात आले परंतु सदर काम पूर्ण न करता सदर कामाचे संपूर्ण बिल उचलल्याचे धक्कादायक प्रकार मुलचेरा तालुक्यातील वेंगनूर येथे दिसून आले होते आणि याबाबत ची लेखी तक्रार अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र देविकार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी यांना केली होती.

सध्या वेंगनूर येथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरु असून इमारतीचे काम पूर्ण होण्यापूर्वीच विद्युत कामे पूर्ण झाल्याचे सांगून बिलाच्या रकमेची उचल करण्यात आली याबाबतची बातमी माध्यमात प्रकाशित झाल्यानंतर लगेच सदर कामे करण्यास सुरुवात करण्यात आली परंतु काम सुरु न करता बिलाची रकम घेऊन मोकळे झाल्याचे छायाचित्र देविकार यांनी घेऊन ठेवले होते. याबाबत ग्राम पंचायत सरपंच यांनी सुद्धा सांगितले की बातमी प्रकाशित झाल्यानंतर सदर सौर ऊर्जेची कामे करण्यात आली.

लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून शासनाला लाखो रुपयाचा चुना लावला जात असल्याचे देवेंद्र देविकार यांचे म्हणणे आहे. आता चौकशी तर झाली परंतु कार्यवाही कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button